मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राचे (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) बनावट संकेतस्थळ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची दखल घेत मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तसेच, या बनावट संकेतस्थळापासून सर्व विद्यार्थी आणि भागधारकांनी सावधान राहण्याचे आवाहनही मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या प्रवेशासाठी व इतर आनुषंगिक बाबींसाठी https:// mu. ac. in/ distance- open- learning हेच अधिकृत संकेतस्थळ असून फक्त याच संकेतस्थळाचा वापर करावा असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
ca ambar dalal
अंबर दलाल प्रकरणात २२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ११०० कोटींचा गैरव्यवहार
korean spy and zombie movies ott a hard day
झॉम्बीजचा भयानक थरार ते गुप्तहेरांच्या गूढ कथा, OTT वरील ‘या’ वेब सीरिज पाहून उडेल थरकाप
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी

हेही वाचा >>>Mumbai Local : तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

सध्या ‘आयडॉल’च्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून विविध अभ्यासक्रमांसाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी https:// mucdoeadm. samarth. edu. in/ फक्त या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.