मुंबईः आसनाच्या खाली बॉम्ब ठेवला असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी प्रवाशाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद नासीर अली आयुफ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे.मुंबई विमानतळावरून लखनऊला जाणाऱ्या विमानातील २१(सी) या आसन क्रमांकावर बसलेल्या मोहम्मद नासीर याने त्याच्या आसनाखाली बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यामुळे विमानाची तात्काळ तपासणी केली. पण विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. पण या घटनेमुळे विमान उशीराने लखनऊला जाण्यासाठी रवाना झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संपूर्ण प्रकारानंतर विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी मोहम्मद नासीर विरोधीत खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. आरोपी दुसऱ्या व्यक्तीच्या आसन क्रमांकावर बसला होता. तेथून तो उठण्यास नकार देत होता. त्यावेळी त्याला विचारले असता त्याने आसनाखाली बॉम्ब असल्याचे खोटे सांगितले. नासीरचा आसन क्रमांक १५(ए) होता. याप्रकरणामागे कोणताही घातपाती प्रकार नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.