मुंबई : अपघातामध्ये उजव्या पायाच्या मांडीचे हाड व गुडघ्याला फ्रॅक्चर झाले आणि हाडांचा चुरा झाला. उजव्या पायाची त्वचा आणि मांस घासून जागोजागी हाडे दिसू लागली होती. डॉक्टरांनी पाय काढण्याची सूचना केली. मात्र जे. जे. रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी विभागाच्या  डॉक्टरांनी एक ते दीड महिने अथक परिश्रम घेऊन जटिल शस्त्रक्रिया करून पुन्हा त्याला त्याच्या पायावर उभे केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

परभणीमधील रहिवासी असलेले ३५ वर्षीय लक्ष्मण टांगडे यांचा १ जानेवारी २०२३ रोजी मोठा अपघात झाला. या अपघातात जखमी झाल्याने त्यांना नांदेडच्या सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड व गुडघ्याला फ्रॅक्चर होऊन चुरा झाले होता. पायाचे हाड फॅक्चर झाले होते. संपूर्ण उजव्या पायाची त्वचा व मांस घासून जागोजागी हाडे दिसू लागली होती. जुजबी उपचार करून त्यांना एका महिन्यानंतर नांदेडच्या सरकारी रुग्णालयातून जे. जे. रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले.

त्यानंतर रुग्णावर प्लास्टिक सर्जरी विभागातील डॉक्टरांनी अनेक शस्त्रक्रिया केल्या. त्याच्या जखमा थोड्या भरल्यानंतर गुडघ्याचे बाहेर दिसू लागलेले हाड झाकण्यासाठी पहिली फॅलप सर्जरी करण्यात आली. मांडीमधील हाडाचा चुरा काढून ॲटीबायोटीक बोन सिमेंट भरण्यात आले. साधारण एक ते दीड महिन्यानंतर डाव्या पायाचे छोटे हाड काढण्यात आले आणिर तेथील त्वचा आणि मांसाचा वापर करून मांडीमध्ये नवीन हाड बनविण्यात आले. हा रुग्ण सध्या उपचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आता हा रुग्ण हळूहळू चालू लागला आहे.