मुंबई : वांद्रे येथील ढाब्यामध्ये चिकनच्या थाळीमध्ये चक्क मृत उंदीर आढळल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी ढाब्याचा व्यवस्थापक, आचारी व चिकन पुरवठा करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार अनुराग सिंह (४०) मुळचे मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. कामानिमित्त सध्या मुंबईत राहत आहेत. ते बँकेत व्यवस्थापक पदावर कामाला आहेत. ते वांद्रे येथील एका प्रसिद्ध ढाब्यावर मित्रासोबत जेवण्यासाठी गेले होते. त्यांनी मटण, चिकन थाळी मागविली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेवत असताना त्यांच्या चिकनच्या थाळीमध्ये मृत उंदीर असल्याचे लक्षात आले. त्यांनी ढाब्याचा व्यवस्थापक व्हिवियन अल्बर्ट शिक्केराश (४०) यांच्याकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर सिंह यांनी याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदार यांना जेवणात मृत उंदीर देऊन जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ढाब्याचा व्यवस्थापक आणि स्वयंपाकीला अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A dead rat on a plate at a dhaba a case has been registered by the bandra police mumbai print news ysh