अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपामुळे आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या ‘हाऊसफुल 4’ चित्रपटामागचं शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाही. #MeToo मोहिमेमुळे आधी नाना पाटेकर आणि नंतर दिग्दर्शक साजिद खान यांना चित्रपट सोडावा लागल्याने चर्चेत आलेल्या हाऊसफुल 4 चित्रपटाच्या सेटवर अजून एका महिलेने गैरवर्तवणूक झाल्याचा आरोप केला आहे. एका महिला ज्युनिअर आर्टिस्टने सेटवर आपला विनयभंग झाल्याचा आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चित्रकूट स्टुडिओमध्ये हाऊसफूल 4 चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना हा प्रकार घडल्याची माहिती महिला कलाकाराने दिली आहे. सहा जण एका ज्युनिअर आर्टिस्टसोबत भांडत होते. त्यातीलच एकाने आपला विनयभंग केल्याची माहिती तिने दिली आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला असून महिला कलाकाराने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल केला आहे.

पीडित महिलने दिलेल्या माहितीनुसार, मी आणि माझा सहकारी कलाकार एकत्र बसलो होतो. यावेळी पवन शेट्टी आणि सागर इतर चार जणांसोबत तिथे आले आणि माझ्यासोबत असलेल्या मित्राला जबरदस्ती घेऊन जाऊ लागले. त्यांनी यावेळी धमकी देखील दिली. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता शेट्टी याने मला धक्का दिला आणि नको त्या ठिकाणी स्पर्श करु लागला. मी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मला त्यांना तुरुंगात पहायचं आहे.