मुंबई : वडाळा येथील ॲन्टॉप हिल नजीकच्या जय महाराष्ट्र नगरमधील एका किराणा दुकानाला बुधवारी रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये स्वयंपाकाच्या दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत पन्नालाल वैश्य (७०) यांचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ॲन्टॉप हिल येथील दुकानाला बुधवारी रात्री आग लागल्याचे समजताच परिसरात गोंधळ उडाला. संबंधित भाग दाटीवाटीचा व चिंचोळा असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. दुकानातील आग विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने आगीचा भडका उडाला. दरम्यान, स्वयंपाकाच्या दोन गॅस सिलिंडरचेही स्फोट झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, रुग्णवाहिका व संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य हाती घेतले. दुकानावरच्या वरच्या मजल्यावर पन्नालाल वैश्य (७०) अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. ते गंभीर जखमी झाले होते. अग्निशामकांनी तत्काळ वैश्य यांना नजीकच्या शीव रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वैश्य १०० टक्के भाजले होते.

हेही वाचा – मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू जोडणीच्या कामाला वेग, अखेर तुळई वरळीत दाखल

हेही वाचा – पार्किंगबाबत विकासकाने माहिती देणे बंधनकारक! महारेराकडून नवे आदेश

या आगीत दुकानातील विद्युत यंत्रणा, विद्युत तारा, किराणा सामान आदी जळून खाक झाले. बुधवारी मध्यरात्री १.१५ च्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A fire broke out at a grocery store in wadala old person died in cooking gas cylinder explosion mumbai print news ssb