मुंबई : अब्दुल रहमान स्ट्रीट येथील जुम्मा मशिदी जवळील ७ ते ८ दुकानांना शनिवारी रात्री ८.१५ च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. तसेच, पोलीस, महापालिका कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत. अब्दुल रहमान स्ट्रीटवरील चार मजली इमारतीला आग लागली असून ७ ते ८ दुकानांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. आग कशामुळे लागली ते समजू शकले नाही.
मुंबई : अब्दुल रहमान स्ट्रीट परिसरातील दुकानाला आग
अब्दुल रहमान स्ट्रीट येथील जुम्मा मशिदी जवळील ७ ते ८ दुकानांना शनिवारी रात्री ८.१५ च्या सुमारास आग लागली.
Written by लोकसत्ता टीम
मुंबई
First published on: 07-01-2023 at 21:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A fire broke out at a shop in abdul rahman street area mumbai print news ysh