मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील आरक्षण केंद्र आणि विश्रामगृहात बुधवारी दुपारी भीषण आग लागली. स्थानकामधील उपहारगृहाचे काम सुरू असताना ही आग लागली. आग लागताच तात्काळ स्थानकातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. आग वाढत असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांनी सांगितले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ झाला, तर काही प्रवासी घाबरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. तसेच, मध्य रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून एलटीटी स्थानकातील फलाट क्रमांक १ वरील ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत मुंबईत आगीच्या घटना वाढत आहेत. गेल्या महिन्या ग्रॅन्ट रोड येथील बहुमजली इमारतीला आग लागली होती. तर, त्यानंतर भायखळा येथील म्हाडा कॉलनीतील बहुमजली इमारतीला आग लागली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A fire broke out in the canteen at lokmanya tilak terminus station located in the kurla area of mumbai sgk
Show comments