मुंबईः गोरेगाव पूर्व येथील इमारतीच्या सातव्या मजल्याला सोमवारी रात्री आग लागली. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी चार बंब व तीन फायर इंजिन पाठवण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
गोरेगाव पूर्व येथील मोहन गोखले मार्गावरील गोकुळधाम जवळील धीरज व्हॅली इमारत क्रमांक दोनच्या सातव्या मजल्यावर आग लागली होती. ही इमारत तळ मजला अधिक सात अशी असून याबाबतची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गर्दीच नियंत्रण करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले. याबाबत महापालिका नियंत्रण कक्षाला विचारले असता रात्री साडे नऊच्या सुमारास आग लागलेली आग विझवण्यात तासाभराने यश मिळते. दरम्यान, दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. तसेच आगीमुळे कोणीही जखमी झाल्याबाबत अद्याप माहिती नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.