मुंबई : कांदिवली पूर्व येथील शाळेतील सुरक्षा रक्षकाने चॉकलेट देण्याच्या बहाण्याचे चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
रुग्णालयात मुलीच्या तपासणीनंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ५५ वर्षीय सुरक्षा रक्षकाविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. चार वर्षांची मुलीच्या आईच्या मुलीने याप्रकरणी तक्रार केली.
मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार याप्रकरणी पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. मुलीला याबाबत विचारले असता शाळेच्या शौचालयात आरोपी सुरक्षा रक्षकाने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने नेले व तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.