इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर तरूणीवर बलात्कार करून तिच्या आक्षेपार्ह छायाचित्राच्या सहाय्याने आरोपीने खंडणी उकळल्याचा प्रकार माहिम येथे घडला आहे. याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी बलात्कार, खंडणी व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – मुंबई : पोलिसाला चावणारा अटकेत

तक्रारदार तरूणी १८ वर्षाची असून ती अल्पवयीन असताना इन्स्टाग्रामवर तिची ओळख २० वर्षीय तरूणाशी झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत काढलेली छायाचित्रे वडिलांना पाठवण्याची, तसेच बदनामी करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिच्याकडून प्रथम दुचाकी घेतली. त्यानंतरही आरोपीचे धमकावणे सुरूच राहिले. आरोपीने पीडित मुलीकडून ४० हजार रुपयांचा मोबाइल घेतला. त्यानंतर आरोपीने तिच्याकडून ३० हजार रुपये रोख घेतले. आरोपीने पीडित मुलीकडून आतापर्यंत दीड लाख रुपयांची खंडण उकळली आहे. याबाबत मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी वांद्रे येथील रहिवासी असल्याचे समजते आहे.

Story img Loader