मुंबई : मुंबई आणि आसपासची शहरे आणि राज्यात अन्यत्र घरफोड्या करून बांगलादेशात जमीनजुमला खरेदी करणारा सराईत चोर व त्याच्या टोळीला जेरबंद करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. ही बांगलादेशी चोरांची टोळी जेरबंद झाल्याने घरफोडीचे शेकडो गुन्हे उघडकीस येतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपींनी भारतात चोऱ्या करून बांगलादेशात मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुन्हे शाखेकडे दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात शाकीर उर्फ गुड्डू हैदर शेख (४५) याचा गुन्हे शाखेचे मालमत्ता पथक गेल्या वर्षभरापासून शोध घेत होते. महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, हैदराबाद येथे शाकीरचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, शाकीर जालन्यात लपला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक तेथे रवाना झाले. शाकीर परतूर येथील एका दुमजली घरात वरच्या मजल्यावर लपल्याचे समजताच पथकाने पहाटेच्या वेळेस तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे शाकीरसह त्याचे अन्य सहा साथीदार पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडे घरफोडीसाठी लागणारे कटावनी, स्क्रु ड्रायव्हर, चॉपर, कोयता हे साहित्य सापडले. तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरगाडी देखील जप्त करण्यात आली. त्या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

हेही वाचा – आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “शरद पवार गटात प्रवेश…”

हेही वाचा – पाकिस्तानातील महिलेला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला अटक

हेही वाचा – “पुन्हा भाजप सत्तेत आल्यास अराजकता”, प्रकाश आंबेडकर म्हणतात, “संविधान बदलण्याचा घाट…”

चौकशीअंती मुख्य आरोपी शाकिरसह त्याचे अन्य चार साथीदार बांगलादेशी असल्याचे उघड झाले. मुळचा बांगलादेशी असलेला शाकीर १५ वर्षांपूर्वी मुंब्रा येथे आला आणि तेथेच तो राहू लागला. गेल्या दहा वर्षांपासून तो घरफोड्या करीत आहे. त्याला २९ गुन्ह्यांत अटक झाली असून १९ घरफोडी प्रकरणी पोलिसांत दाखल गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. शाकीरला चार गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. तर आठ गुन्ह्यांत त्याच्या विरोधात अजामिनपात्र, एका गुन्ह्यात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A gang of bangladeshi nationals arrested for house robbery in india mumbai print news ssb