परकीय चलनाऐवजी कागदाचे बंडल देऊन फसवणूक करणाऱ्या एका टोळीला नेहरूनगर पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आणि ६४ सिम कार्ड हस्तगत केली असून याप्रकरणी अन्य पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

काही दिवसांपूर्वी कुर्ला परिसरात गस्त घालत असताना नेहरूनगर पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते. झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याजवळ बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने परकीय चलनाचे आमीष दाखवून फसवणूक केल्याचे कबुल केले.

Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
Allegations of fraud with 1700 flat buyers in Taloja housing project Developer Lalit Tekchandanis arrest is illegal
तळोजा येथील गृहप्रकल्पातील १७०० सदनिका खरेदीदारांच्या फसवणुकीचा आरोप, विकासक ललित टेकचंदानी यांची अटक बेकायदा
in pune mobile thief dragged youth and bite his hand for mobile at hadapsar area
मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांनी पादचारी तरुणाला फरफटत नेले, विरोध करणाऱ्या तरुणाचा हाताचा चावा
ED files money laundering case against BRS leader KT Rama Rao
ED Files Money Laundering Case ईडी पुन्हा सक्रिय! ‘या’ नेत्याविरोधात मोठी कारवाई, आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल
Absconding young woman arrested , woman arrested fraud case, woman fraud with builder,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाची चार कोटींची फसवणूक प्रकरणात फरार झालेली तरुणी गजाआड
cuffe parade National Company Law Tribunal Porn videos courtroom screen
न्यायदालनातील स्क्रीनवर लागली अश्लील चित्रफीत, संगणक प्रणाली हॅक केल्याचा संशय

हेही वाचा – मुंबई : शिवाजी पार्क परिसरात ड्रोन, छोटी विमाने उडवण्यास मज्जाव

हेही वाचा – मुंबई : स्वराज्यभूमीवरील लोकमान्य टिळकांच्या समाधीस्थळी नामफलक बसविण्यात दिरंगाई

टोळीतील आरोपी अनोळखी व्यक्तींना फोन करून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात परकीय चलन असल्याची माहिती देत होते. परकीय चलन कमी किमतीत देण्याचे आमीष दाखवूत ते या व्यक्तीला पैसे देण्यासाठी निर्जन ठिकाणी भेटायला बोलवत होते. यावेळी इतर आरोपी व्यक्तीला बोलण्यात गुंतवून त्याला परकीय चलनाऐवजी बनावट नोटा देऊन त्याची फसवणूक करीत होते. या टोळीने अशा प्रकारे मुंबईत अनेकांना मोठ्या प्रमाणात गंडा घातला असून याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अन्य पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Story img Loader