मुंबई : चेंबूर येथे जुन्या वादातून सहा जणांच्या टोळीने एकावर चाकूने हल्ला केला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तींलाही या टोळीने मारहाण केली. या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून त्यापैकी दोघे सराईत आरोपी असल्याची माहित पोलिसांनी दिली.

सीताराम जगताप, सुरेश जगताप, रुपेश वैराळ, सागर कांबळे, सुधाकर अवसरमल व रुपेश कांबळे अशी अटक आरोपीची नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापैकी सीताराम जगताप व सुरेश जगताप दोघेही सराईत आरोपी असून सीताराम विरोधात सहा, तर सुरेश विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. वैराळ विरोधातही एक मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Pistol seized Panvel, Panvel, Pistol seized, loksatta news,
पनवेलमधील आरोपीच्या घरातून पिस्तुल जप्त
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Husband arrested, wife dowry Mumbai , Accusations of strangulating wife,
हुंड्यासाठी पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप, पती अटकेत
son kills mother Ghaziabad crime news
Son Kills Mother: वीस हजारांसाठी जन्मदात्या माऊलीचा खून; मित्रांनी आईचे हात धरले, मुलानं वीट घेतली आणि…
Baba Siddique murder case, conspirator, person arrested from Haryana,
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : कट रचणारा व शूटर्समधील दुवा पोलिसांच्या हाती, हरियाणातून एकाला अटक
notorious chhota rajan granted bail by bombay high court
जया शेट्टी हत्या प्रकरण;कुख्यात छोटा राजनला उच्च न्यायालयाकडून जामीन;व्यावसायिक अन्य प्रलंबित खटल्यांमुळे तुरुंगातच मुक्काम
boy who was recently released from juvenile detention center stabbed to death
अमरावतीत हत्‍यासत्र थांबेना, अल्‍पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्‍या
baba siddique son Zeeshan on target
‘बाबा सिद्दिकी नाहीतर झिशान’, शूटर्सला काय सांगण्यात आलं होतं? पोलिसांनी उलगडला धक्कादायक प्लॅन

हेही वाचा >>>‘आपला दवाखान्यां’त राज्यातील २७ लाख रुग्णांनी घेतले उपचार

चेंबूर मुकुंद नगर परिसरात ही घटना घडली. या टोळीने सिद्धार्थ कांबळे (३२) याच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्याच्यासोबत असलेला मित्र विकास धेंडे यालाही या टोळीने मारहाण केली. सीताराम जगतापने चाकूने सिद्धार्थ कांबळेवर वार केले. जखमी सिद्धार्थला घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सिद्धार्थच्या मानेवर, मनगटावर व पोटावर गंभीर जखमा झाल्या होत्या. गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे. यावेळी झालेल्या मारहाणील धेंडेही जखमी झाला असून त्याच्याच तक्रारीवरून आरसीएफ पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.