मुंबई : अंधेरी पूर्व येथील महाकाली मार्गावर सोमवारी मध्यरात्री दरड कोसळली. एका सात मजली इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावरील माती वेगाने खाली आली. यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून  इमारतीतील १६८ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. महाकाली मार्गावर गुरुनानक शाळेजवळ असलेल्या सात मजली ‘रामबाग’ गृहनिर्माण सोसायटीच्या मागील डोंगरावरची माती मध्यरात्री दीडच्या सुमारास खाली सरकू लागली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोठ्या प्रमाणावर माती आणि दगड खाली कोसळल्यामुळे इमारतीलगत दुसऱ्या मजल्यापर्यंत मातीचा ढिगारा झाला. सुरक्षिततेचा उपाय म्हणून इमारतीमधील सुमारे १६८ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. रहिवाशांची सध्या गुंदवली येथील महापालिका शाळेत तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इरशाळवाडी येथील दरड दुर्घटनेनंतर मुंबईतील दरडीवरच्या वसाहतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.