मुंबई: सायन पनवेल महामार्गाची दूरवस्था झाली असून या मार्गावरील रस्ते दुभाजक, पदपथ यांची दुरुस्ती व रंगरंगोटी करावी किंवा हा रस्ता मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करावा, असे पत्र मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला लिहिले आहे. तसेच या महामार्गालगत असलेल्या कांदळवनाचे संरक्षण करण्यासाठी संरक्षण कुंपण घालावे अशी विनंतीही पालिका प्रशासनाने विभागीय वन अधिकाऱ्यांना केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने संपूर्ण मुंबईत स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत गेल्या आठवड्यात पालिका अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी मानखुर्द परिसरात भेट दिली. यावेळी शीव-पनवेल महामार्गावर त्यांना मानखुर्द टी जंक्शन ते वाशी टोल नाका या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. याबाबत डॉ. शिंदे यांनी उप आयुक्त हर्षद काळे आणि सहायक आयुक्त (एम पूर्व) अलका ससाणे यांच्या माध्यमातून एम पूर्व विभागाचे सहायक अभियंता यांची सुट्टी त्वरित रद्द करुन हा परिसर कचरामुक्त करण्याचे आदेश दिले होते. तसेच, शीव-पनवेल महामार्गाच्या यांत्रिकी स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारावर कामात कुचराई केल्याबद्दल २ लाख रुपयांचा दंड आकारुन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्याचप्रमाणे या भागात अनधिकृतपणे राडाराडा (डेब्रिज) टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>मुंबईत उद्या दहा ठिकाणी महा स्वच्छता अभियान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी सहभागी
याच पार्श्वभूमीवर आता एम पूर्वच्या सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून हा रस्ता पालिकेकडे हस्तांतरीत करण्याची विनंती केली आहे. या मार्गावरील पदपथ, रस्ते दुभाजक यांची दुरुस्ती व रंगरगोटी करावी किंवा हा रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित करावा अशी विनंती उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लिहिलेल्या पत्रात केली आहे. यापूर्वी पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असल्यामुळे पालिकेला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत होते. दोन प्राधिकरणांच्या हद्दीचा वाद वाढल्यानंतर एमएमआरडीएने ही दोन्ही मार्ग नोव्हेंबर २०२२ मध्ये पालिकेकडे हस्तांतरित केले. पालिकेने आता पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यातच आता शीव पनवेल मार्ग येत्या काळात मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित होणार का याबाबत उत्सुकता आहे.
कांदळवनांभोवती संरक्षण कुंपण घाला
सायन पनवेल महामार्गालगत असलेल्या कांदळवनामध्ये काही ठिकाणी भराव घालून अनधिकृतपणे अतिक्रमण करण्यात येत आहे. तसेच या कांदळवनाची हद्द ही सायन पनवेल मार्गालगत असून तेथे झाडे झुडपांची अनियंत्रित वाढ झाल्यामुळे महामार्गाची साफसफाई करण्याकरीता अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे याठिकाणी संरक्षण कुंपण बांधावे, अशी विनंती सहाय्यक आयुक्तांनी विभागीय वन अधिकारी, कांदळवन कक्ष यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.