मुंबई : चेंबूरच्या आशिष सिनेमा परिसरातील ‘शेठ हाइट’ या २५ मजली इमारतीला बुधवारी दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उच्चभ्रू लोकवस्तीतील या इमारतीमध्ये गेल्या काही दिवसापासून डागडुजी करण्यात येत आहे. यासाठी इमारतीच्या बाहेरील बाजूस हिरवा कपडा बांधण्यात आला असून  या कपड्याला आग लागली. क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र आगीत अनेकांची वातानुकूलित यंत्रणा आणि काही घरांमधील सामानाचे नुकसान झाले. सध्या अग्निशमन दलाचे जवान अग्निशमनाचे काम करीत आहेत.