चेंबूरच्या टिळक नगर परिसरात शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास ‘नवीन टिळक नगर’ या १४ मजली इमारतीला भीषण आग लागली. या इमारतीमध्ये अनेक रहिवासी अडकले असून आगीचे वृत्त समजताच टिळक नगर पोलीस आणि अग्निशमन दलाचे १२ ते १५ बंब घटनास्थळी रवाना झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नागपूर – गोवा प्रवास आता पूर्ण करता येणार केवळ आठ तासांत

आगीमुळे इमारतीमध्ये धुराचे साम्राज्य पसरले असून धुरापासून बचाव करण्यासाठी काही रहिवासी खिडकीच्या ग्रीलमध्ये बसले होते. अग्निशमनाबरोबरच दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाने युद्धपातळीवर हाती घेतले होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही.