मुंबई : सांताक्रुझ येथील कलिना परिसरातील नवनीत मोटर्स या गाड्यांच्या शोरूमला बुधवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.
हेही वाचा – अटल सेतूवर लवकरच फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप
हेही वाचा – ईडीलाच बसला दंड! ‘चौकशीच्या नावाखाली छळ नको’, मुंबई उच्च न्यायालयाची ईडीला समज
नवनीत मोटर्सच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात बुधवारी सकाळी आग लागली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आग नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शोरूमबाहेर धाव घेतली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन सकाळी ८.०० वाजता क्रमांक १ ची वर्दी देण्यात आली. प्रयत्नांची पराकाष्ठा करीत सकाळी ९.५१ च्या सुमारास आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या दुर्घटनेत शोरुमचे मोठे नुकसान झाले.