मुंबई: गेली अनेक वर्षे दुरावस्थेत असलेले आरे वसाहतीमधील रुग्णालय चालविण्यासाठी अखेर वैद्यकिय संस्थेची निवड करण्यात आली आहे. आरे वसाहतीमधील रुग्णालय चालविण्याची जबाबदारी कुर्ला येथील आर्यन मेडिकल ॲण्ड एज्युकेशन संस्थेवर सोपविण्यात येणार आहे. दरम्यान, या आराखड्याचा तपशील राज्याच्या दुग्धविकास विभागाकडे पाठवण्यात आला असून, पुढील आठवड्यापर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. हे रुग्णालय चालविण्यात स्वारस्य असलेल्या काही संस्थांच्या प्रतिनिधींना दुग्धविकास विभागाने ऑक्टोबरमध्ये बोलावले होते. यासंदर्भात संबंधित प्रतिनिधींबरोबर चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांची निवड चाचणीही घेण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुग्णालय चालविण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियेअंती एकूण आठ संस्थाची निवड करण्यात आली. निवडलेल्या संंस्थांनी आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली असून त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील १७ वर्षांचा अनुभव आहे, असे आरे दूध वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी सांगितले. संस्थेचे दर आणि निकषांबाबतही निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भात योग्य त्या प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे. यापुढील निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे वाकचौरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… १७ पोलीस वसाहतींचा पुनर्विकास म्हाडा करणार!

दरम्यान, पूर्वीच्या अहवालांनुसार रहिवाशांकडून रुग्णालयाच्या खाजगीकरणाला विरोध करण्यात येत होता. त्यानंतर सर्वानुमते रुग्णालय सार्वजनिक प्राधिकरणांतर्फे पूर्णपणे चालविण्याऐवजी धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आरे येथील रुग्णालय चालविण्यासाठी कोलकाता येथील आत्माराम गीतादेवी केजरीवाल ट्रस्ट, आर्यन मेडिकल ॲण्ड एज्युकेशन संस्थे, अग्रवाल जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट, महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्ट, साई लीला फाउंडेशन ट्रस्ट, सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट, एसएल चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोशन लाईफ फाउंडेशन या आठ संस्थांनीही स्वारस्य दाखविले होते. अखेर सर्व निकषांची पडताळणी करून आर्यन मेडिकल ॲण्ड एज्युकेशन संस्थेची निवड करण्यात आली. आरेतील १ एकर जागेवर हे रुग्णालय आहे. आरे वसाहतीमध्ये सुमारे २७ आदिवासी पाडे आहेत. तसेच कर्मचारी वसाहतींमध्ये हे केंद्र महत्त्वाचे आहे. या परिसरात या रुग्णालयाखेरीज आरोग्यसेवा नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A medical institution has finally been selected to run the hospital in aarey colony mumbai print news dvr
Show comments