मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११.३० वाजेपर्यंत आडवली ते आचिर्णे विभागादरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मुफ्ती सलमान अझहरी यांच्या अटकेविरोधात जमाव गोळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलिसांवर दगडफेक

हेही वाचा – लिंग परिवर्तन करण्यामध्ये पुरुषांची संख्या अधिक

कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे प्रामुख्याने सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेसचा ९ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड- कणकवली विभागादरम्यान ९० मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे. गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचा ९ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी स्थानकादरम्यान १० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. तसेच इतर रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही कोलमडण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A megablock of two and a half hours on the konkan railway line mumbai print news ssb
Show comments