मुंबई: घरात घुसून मोबाइल चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतले. या मुलाच्या ताब्यातून पोलिसांनी काही मोबाइल हस्तगत केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीन महिन्यांपूर्वी मुलुंडमधील शास्त्री नगर परिसरातील एका घरात शिरून अज्ञात इसमाने मोबाइल चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अनेक दिवस मोबाइल बंद असल्याने पोलिसांना त्याचा शोध घेता आला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी ठाणे परिसरातील एक व्यक्ती हा मोबाइल वापरत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार त्यांनी मोबाइल वापरणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. हा मोबाइल आपल्याला एका अल्पवयीन मुलाने विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

हेही वाचा… म्हाडातील १४०० कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच

पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलुंडमधील वैशाली नगर परिसरातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याने अशाच प्रकारे अनेक मोबाइल चोरल्याचा पोलिसांना संशय असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor boy who stole a mobile phone is in police custody mumbai print news dvr