मुलुंडमध्ये भर दुपारी एका अल्पवयीन मुलीचा धावत्या रिक्षात विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.या मुलीने त्याला प्रतिकार करताच तिला रिक्षातून बाहेर फेकून देण्यात आले. या प्रकरणी मनोहर सुखोसळे (५६) याला पोलिसांनी अटक
केली.
मुलुंड येथे राहणारी एक १७ वर्षीय अल्पवयीन तरुणी बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास क्लासला जाण्यासाठी निघाली होती. मुलुंड पश्चिमेच्या पोस्ट अॅण्ड टेलिकॉम वसाहत येथून ती मुलुंड स्थानकाजवळ जाण्यासाठी रिक्षा पकडणार होती. परंतु त्या रिक्षात एक इसम बसल्याचे लक्षात आल्यानंतर ती पुढे गेली. तेव्हा रिक्षात बसलेला आरोपी मनोहर सुखशोळे (५६) याने आपणही मुलुंड स्थानकात जात असून तुला सोडतो असे सांगितले.सुरूवातीला मुलगी रिक्षात बसायला तयार नव्हती.मात्र त्याने आग्रह केल्यानंतर ती बसली. रिक्षा काही अंतरावर जाताच मनोहरने तिच्या जवळ जात तिला हात लावण्याच प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकाराने ती बिचकली. मनोहरने नंतर तिचा रिक्षातच विनयभंग करण्यास सुरवात केली. त्यामुळे ही मुलगी बचावासाठी ओरडू लागली. त्यामुळे मनोहरने तिला रिक्षातून खाली ढकलून दिले. याप्रकारामुळे रिक्षा चालकाने रिक्षा थांबवली व तेथील रहिवाशांच्या मदतीने मनोहरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ताजणे यांनी सांगितले.
जखमी मुलीला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिच्या डोक्याला मार लागला होता. मनोहर याच्यावर विनयभंगासह बाल लैंगिक प्रतिंबधात्मक कायदा (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा