मुंबई : अंधेरी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली २२ वर्षीय तरूणाविरोधात डी. एन. नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अंधेरी येथील गिल्बर्ट हिल बीट चौकी मागे असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ बुधवारी हा प्रकार घडला.

पीडित मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता तेथे आरोपीने तिचा विनयभंग केला. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी तिला दिली. त्यामुळे मुलगी घाबरली होती. तिने घरी आल्यानंतर हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

Story img Loader