मुंबईः फेसबुवर ओळख झालेल्या मित्राने १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर पाठवल्याचा प्रकार फोर्ट परिसरात घडला आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी व पीडित मुलीची फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने आझाद मैदान येथील हॉटेलमध्ये नेऊन पीडित मुलीवर लैगिक अत्याचार केला. त्याचे चित्रीकरण त्याने मुलीला पाठवले होते. पीडित मुलगी शाळेत गेली असताना तिची आई व मोठ्या बहिणीने तिचे इन्स्टाग्राम खाते तपासले असता त्यात एका तरूणाकडून मुलीचे अश्लील चित्रीकरण असलेल्या सहा चित्रफीती पाठवल्या असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत विचारले असता पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून आरोपी तरूणाविरोधात एम.आर.ए. मार्ग पोलिसांनी भांदवि कलम ३७६ (३) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुरूवारी गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल