मुंबई : केरळमध्ये थिरूवअनंतपुरम येथील काराकुलम येथे ८ डिसेंबर रोजी ओमिक्राॅनचा उपप्रकार असलेल्या ‘जेएन.१’चा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर आता महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘जेएन.१’चा एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.डिसेंबरच्या सुरुवातीपासून अमेरिका, चीन आणि सिंगापूर या देशांमध्ये ‘जेएन.१’ या नव्या उपप्रकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.

त्यातच केरळमध्ये ८ डिसेंबर रोजी ‘जेएन.१’ची एका ७९ वर्षीय महिलेला लागण झाल्याचे आढळून आले. या महिलेमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून आली असली तरी ती आता पूर्णपणे बरी झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यात सिंधुदुर्गामध्ये एका ४१ वर्षीय व्यक्तीला ‘जेएन.१’ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या रुग्णाने प्रवास केल्याची कोणतीही पार्श्वभूमी नाही. नियमित तपासणीत हा रुग्ण आढळला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Story img Loader