मुंबई : आईने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन गुरुवारी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपी मुलाने दगडफेक केली. यात एक पोलीस जखमी झाला. त्यानंतर टिळकनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल बाळू भोसले (२८) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो चेंबूर येथील सिद्धार्थ नगरमधील रहिवासी आहे. आरोपी त्याच्या आईला त्रास देत होता. त्यामुळे आईने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मदत मागितली. त्यानुसार चेंबूर पोलीस ठाण्यातील मोबाइल व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी आरोपीला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने पोलीस व नागरिकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. कोणी अडवले, तर त्याला सोडणार नाही, अशी धमकी तो देऊ लागला. त्याने केलेल्या दगडफेकीत एक पोलीस हवालदार जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले.

हेही वाचा – म्हाडाचे घर आमदारांच्याही आवाक्याबाहेर!; नारायण कुचेंकडून साडेसात कोटींची दोन्ही घरे परत, आता भागवत कराड यांना संधी

हेही वाचा – “राज्यकर्ते शास्त्रज्ञांना बोलू देण्याऐवजी स्वतःच्या भाषणाची…”; ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याप्रकरणी जखमी झालेल्या पोलिसाची प्रकृती ठीक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A person who pelted stones at a police team was arrested in mumbai mumbai print news ssb
Show comments