मुंबई: १३ वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीला मालवणी पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात बलात्कार, विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – मुंबई : धुलीकणांचे प्रमाण वाढले, देवनारमधील हवा ‘अतिवाईट’, शीव, मालाड, वांद्रे-कुर्ला संकुलमधील हवा ‘वाईट’

हेही वाचा – मुंबई : एटीएम केंद्रात चोरी करणारी सहा जणांची टोळी अटकेत, कुरार पोलिसांची कारवाई

पीडित मुलगी घरा शेजारी खेळत होती. खेळता खेळता ती आरोपीच्या घरात गेल्यानंतर त्याने दरवाजा बंद करून मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर तिने याप्रकरणी मालवणी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला घरातून अटक करण्यात आली.

Story img Loader