परदेशातून भारतात म्युझिक सिस्टिमची तस्करी करणाऱ्या एका वैमानिकाला सीमाशुल्क विभागाने गुरूवारी अटक केली. त्याच्याकडून ३२ लाखांची म्युझिक सिस्टम जप्त करण्यात आली आहे.
जेट एअरवेजच्या (९ डब्ल्यू २२७) या विमानाने गुरूवारी दुपारी अर्षद फ क्रुद्दीन (४०) नावाचा वैमानिक मुंबईत उतरला. बेल्जिमयहून विमानाच्या केबीन क्रूमधून प्रवास करुन तो मुंबईत आला होता. त्याच्याजवळील सामानाचा संशय आल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली. त्याच्या सामानात एक महागडी म्युझिक सिस्टिम आढळली.
त्याची किंमत ६० हजार रुपये असल्याचा दावा त्याने सुरुवातीला केला होता. परंतु, अधिकाऱ्यांचे समाधान न झाल्याने इंटरनेटवरुन माहिती काढून बाजारभावाची किंमत काढली. ती फ्रान्स बनावटीची मेन्ट्रोकोम टेक्नॉलॉजीची साऊण्ड सिस्टिम असल्याचे आढळून आले. त्याची किंमत ३२ लाख रुपये होती. याबाबत माहिती देतांना सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त किशोर वानखेडे यांनी सांगितले की, व्यावसायिक वापरासाठी ही साऊण्ड सिस्टिम वापरली जात असून जगातली ती सर्वात महागडी साऊण्ड सिस्टिम आहे. आम्ही त्याला तस्करीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.
वैमानिकासह केबीन क्रू ला केवळ ६०० रुपयांपर्यत सीमाशुल्का सवलत असते. फक्रूद्दीन याचा मासिक पगार ४ लाख रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले. या म्युझिक सिस्टिमसाठी त्याला १० लाख रुपये सीमा शुल्क भरावा लागला असता. सीमाशुल्क विभागाने ही सिस्टिम जप्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा