मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे ते कुर्ला व्हाया वांद्रे-कुर्ला संकुल अशी पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पॉड टॅक्सी मार्गिकेच्या बांधणीसह पॉड टॅक्सी सेवेचे संचलन, देखभालीसाठी एमएमआरडीएने नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करत शक्य तितक्या लवकर कामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. दरम्यान या पॉड टॅक्सी प्रकल्पातील डेपो बीकेसीत ५००० चौ मीटर जागेवर बांधण्यात येणार आहे. या डेपोत एका वेळी २०८ पॉड टॅक्सी उभ्या करता येणार असून येथे या टॅक्सीची देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे.

बीकेसीतील वाहतूक कोंडी दूर करत बीकेसीत येणे-जाणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक-खासगी सहभागातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक व्हाया बीकेसी अशी ही पॉड टॅक्सी ८.८ किमी अंतरावर धावणार आहे. बीकेसीतील एमटीएनएल जंक्शन ते कुर्ला रेल्वे स्थानक प्रवास बेस्ट बसने करण्यासाठी २५ ते ३० मिनिटे लागतात. पण सहा प्रवाशी क्षमतेच्या पॉड टॅक्सीने हे अंतर केवळ पाच मिनिटात पार करणे शक्य होणार आहे. अशा या पॉड टॅक्सीच्या मार्गिकेच्या बांधणीसाठी, पॉड टॅक्सीचे संचलन आणि देखभाल करण्यासाठी ६ मार्चला निविदा प्रसिद्ध केली आहे.

Dombivli MIDC ban on Heavy vehicles Shilphata road
Shilphata Traffic : शिळफाटा रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी, डोंबिवली एमआयडीसीतील मालवाहू वाहने अडकली
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Hinjewadi it park traffic jam news
पिंपरी : शहरातील एनएच-४८ महामार्ग सेवा रस्त्यांचा होणार विस्तार, आयटी पार्क हिंजवडीतील कोंडी सुटणार…
Hinjewadi traffic jam
‘आयटी’तील पुणेकरांची आणखी वर्षभर कोंडी, उन्नत मार्ग रखडल्याने हिंजवडीकरांना दिलासा नाहीच
new ST buses in phased manner 110 buses have been made available
एसटीच्या नवीन गाड्या मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चुरस… तोटा झाल्यास सरकारकडून…
पुणे : ‘ती बस’ पुन्हा सुरू होणार; पण आता शुल्क लागणार
Loksatta anvyarth Rickshaw taxi and ST bus fares hiked
अन्वयार्थ: भाडेवाढ, निविदा… मग प्रवाशांचा विचार कधी?
Road construction by laying slabs on drain in Wagle Estate
वागळे इस्टेटमध्ये नाल्यावर स्लॅब टाकून रस्त्याचे बांधकाम

हेही वाचा – सागरी किनारा मार्गावर पहिल्याच दिवशी १६ हजार वाहने, वरळीतून प्रवेश केवळ ५ वाजेपर्यंत, कोंडीमुळे निर्णय

हेही वाचा – रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर नियुक्तीची पत्रे, मध्य रेल्वेतील धक्कादायक प्रकार

प्रक्रियेस १५ दिवस उशीर

मंगळवारी (१२ मार्च) निविदेचे दस्ताऐवज प्रसिद्ध करण्यात येणार होते. मात्र काही कारणाने यास विलंब झाला असून आता २६ मार्चला निविदा दस्ताऐवज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निविदानुसार १२ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान इच्छुक कंपन्यांना निविदा सादर करता येणार होत्या. पण आता मात्र यास अंदाजे १५ दिवस ही प्रक्रिया पुढे जाणार आहे.

Story img Loader