मुंबई : कारवाई केल्याच्या रागातून कुर्ला येथे पोलीस हवालदाराला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपी अब्बास हबीब मर्चंट (३७) विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अविनाश जाधव हे कुर्ला पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहेत.
हेही वाचा – मुंबई : देवनारमध्ये कचऱ्यापासून दुप्पट वीजनिर्मिती
हेही वाचा – मुंबई : शिवाजी पार्क येथे दगडाने ठेचून एकाची हत्या, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक
तक्रारदार जाधव यांनी मर्चंटच्या रिक्षावर २६ डिसेंबरला कारवाई केली होती. त्याचा राग म्हणून जाधव सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांविरोधात कारवाई करत असताना मर्चंट त्यांचे चित्रीकरण करू लागला. तसेच, कारवाईबाबत पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले असता मर्चंटने जाधव यांना मारहाण केली. याप्रकरणी जाधव यांना किरकोळ दुखापत झाली असून पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.