राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर अलीकडेच शस्त्रक्रिया करण्यात आली. अंतुले यांना मूत्रपिंडाचा त्रास असून, सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस पक्षाध्यक्षांचे राजकीय सचिव अहमद पटेल आणि राज्याचे पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी रुग्णालयात जाऊन अंतुले यांच्या प्रकृतीची चौकशी केली. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. तोंडात सूज आल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. त्यांची प्रकृती उत्तम असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल, रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Story img Loader