मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील सामान्य (जनरल) डब्यात आसन मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून १०० रुपयांची लाच घेणाऱ्या रेल्वे पोलिसाची ध्वनिचित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गणेश पाटील याला निलंबित करण्यात आले. दरम्यान, गेल्याच महिन्यात एलटीटी स्थानकावरील स्टॉलचालक ५० ते १०० रुपये घेऊन एक्स्प्रेसमध्ये आसन मिळवून देत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – साई रिसॉर्ट प्रकरण: अनिल परब यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा

हेही वाचा – मुंबई : रुग्णालयांतील बाह्यरुग्णसेवा सुरळीत, मात्र आंतर रुग्णसेवेवर परिणाम

गेल्या आठवड्यात एलटीटीवर फलाट क्रमांक १ वर कर्तव्यावर असलेला गणेश पाटील एक्स्प्रेसमधील सामान्य डब्यात आसन मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून १०० रुपये घेत होता. याबाबतची ध्वनिचित्रफीत ट्विटरवर प्रसारित झाली. तक्रारदाराने याप्रकरणी पाटीलविरोधात तक्रार केली होती. या घटनेची गंभीर दखल घेत लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी गणेश पाटील याला निलंबित केले.