मुंबई: महापालिका शाळेत दोन मुलांनी तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार, धमकावणे व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> दादर स्थानकात सहा क्रमांक फलाटातून प्रवेशबंदी; महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोहमार्ग पोलिसांचे नियोजन

पीडित मुलीच्या वहिनीच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार २८ नोव्हेंबरला प्रकार घडला. पीडित मुलगी आठवीत असून असून नृत्य सरावासाठी एका वर्गात गेली होती. त्यावेळी सायंकाळी ५ ते ५.३० च्या सुमारास आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणालाही अशी सांगू नये धमकी दिली. पीडित मुलीने घडलेला प्रकार वहिनीला सांगितल्यानंतर तिच्या तक्रारीवरून मंगळवारी पोलिसांनी याप्रकरणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, दोन्ही आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A schoolgirl was sexually assaulted by two students mumbai print news ysh