मुंबई : मुंबई महानगरपालिकांच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना कशाप्रकारे आरोग्य सेवा मिळतात हे पाहण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे रात्री रुग्ण बनून रुग्णालयांना अचानक भेट देत आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई महानगरपालिकेचा अतिरिक्त आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिंदे यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून रुग्णालयांचा आढावा घेतला. त्यानंतर महानगरपालिकेची रुग्णालये, दवाखाने आणि प्रसुतिगृहांची पाहणी सुरू केली. ते अधिकाऱ्यांसोबत सकाळी रुग्णालयाचे निरीक्षण करीत आहेत, तर रात्री स्वतः रुग्ण बनून रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

हेही वाचा – मुंबई : एटीएम व्हॅनमधील रोकड लुटून चालकाचे पलायन

हेही वाचा – मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

प्रसुतिगृहामध्ये रुग्णांसोबत डॉक्टरांचा समन्वय पाहून शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांनी प्रसुतिगृहातील डॉक्टरांना सौजन्याने धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रुग्णालयांमध्ये स्वच्छता राखण्यावर भर देण्यात येत असल्याचे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.