मुंबई – घरात भावंडांशी खेळत असताना दोरीचा फास लागल्याने एका सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात घडली. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे.

बैंगवाडी येथे रविवारी दुपारी बाराच्या सुमारास आकृती सिंह ही तिची भावंडे आणि शेजारील एका मुलीबरोबर लपाछपी खेळत होती. त्यावेळी घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते. त्यामुळे घरात ही चार मुले होती. त्याचवेळी पोटमाळ्यावरून खाली उतरण्यासाठी लावण्यात आलेल्या शिडीच्या दोरीचा फास मुलीच्या गळ्यात अडकला. तिच्या मोठ्या बहिणीने तत्काळ घराबाहेर धाव घेत शेजाऱ्यांना घटना सांगितली. शेजाऱ्यांनी तिला खाली काढून परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

2 killed as auto overturn in khed taluka
मरकळ येथे रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत
mother and her boyfriend sentenced to life for murdering her child by drowning
मुलाचा खूनप्रकरणी, आईसह प्रियकरास जन्मठेप
girl died in road accident parents donated their organs giving life to six people
अपघातात जीव गमावूनही तिनं दिलं सहा जणांना जीवदान…
Four young laborers died when iron plate fell on them in Tunki Shivara on January 27
लोखंडी प्लेटा अंगावर पडून चौघांचा मृत्यू
Ankit Barai 20 year old youth died in an explosion at an ordnance factory Calling boy to come back father fainted
स्फोटात गमावलेल्या मुलाला परत ये…ची हाक देत वडील बेशुद्ध… बहिणीचे तर अश्रूच गोठले….
पिंपरी : कंटेनरच्या अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू

हेही वाचा – Worli accident : वरळीत अपघातात निष्काळजीपणामुळे मृत्यूचे कलम वाढवले

हेही वाचा – CSMT NEWS :मृत उंदरांची तपासणी पशु वैद्यकीय रुग्णालयात होणार; दिडशेपेक्षा अधिक मृत उंदीर आढळल्याने कर्मचारी भयभीत

शिवाजीनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मुलीच्या घरी धाव घेत तपास सुरू केला. मुलीचा मृत्यू फास लागल्याने झाला असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.

Story img Loader