मुंबई: मुलुंड कचराभूमी रोड परिसरात सोमवारी सकाळी एका भरधाव ऑडी गाडीने दोन रिक्षांना धडक दिली. त्या अपघातात एकूण चारजण जखमी झाले असून त्यातील एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी सकाळी सातच्या सुमारास मुलुंड कचराभूमी रोड परिसरात ही घटना घडली. ऑडी चालक भरधाव वेगात या मार्गावरून जात असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर त्याने दोन रिक्षांना जबर धडक दिली. त्यातील एका रिक्षात दोन प्रवासी होते. त्यांच्यासह दोन्ही रिक्षा चालकही जखमी झाले असून एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांवर परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर ऑडी चालकाने गाडी घटनास्थळी सोडून पोबारा केला आहे. मुलुंड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत, ऑडी गाडी ताब्यात घेतली असून चालकाचा शोध सुरू केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A speeding audi car hit two rickshaws in mulund mumbai print news amy