भारतीय समाजात शिक्षकाला ‘गुरू ब्रह्मा, गुरू विष्णू, गुरूदेवो महेश्वरा’चा उच्च दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे पालकांप्रमाणे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांची काळजी घेणे त्याचे कर्तव्य आहे, असे नमूद करन १० ते ११ वर्षे वयोगटातील चार विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याबद्दल विशेष न्यायालयाने शिक्षकाला दोषी ठरवून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
हेही वाचा- २५ वर्षे फरार आरोपीला गुजरातमधून अटक; बनावट धनादेश तयार करून फसवणुकीचा आरोप
पीडित मुलींवर त्यांच्याच शिक्षकाने वर्गात आणि शाळेच्या आवारात लैंगिक अत्याचार केले. आपल्या समाजात, मुलींच्या शिक्षणाला अजूनही कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळत नाही आणि अशा प्रकारच्या घटनांमुळे मुलींना शाळेत पाठवण्यास पालक घाबरतात. अशा घटनांमुळे इतर मुलींच्या शिक्षणाच्या संधीवर परिणाम होतो, असेही विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश नाझेरा शेख यांनी चारुदत्त बोरोले याला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवताना नमूद केले. तसेच या प्रकरणातील पीडित मुलींनी तक्रार नोंदवण्याचे धैर्य दाखवल्याबाबत कौतुक केले.
हेही वाचा- अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने मुंबईतील तरुणाला आत्महत्येपासून रोखले
ब्रह्म, विष्णू आणि महेश्वर म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासह त्यांच्यात जागरूकता निर्माण करतो, त्यांच्यातून सक्षम नवीन पिढी तयार करत असतो. जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठीही शिक्षक त्यांना शिक्षणातून सक्षम करत असतो. पालकांप्रमाणेच विद्यार्थ्यांची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य आहे. परंतु या प्रकरणातील आरोपीने शिक्षक असल्याचा गैरफायदा घेऊन विद्यार्थिनींची लैंगिक छळवणूक केली, असे न्यायालयाने बोरूले याला शिक्षा सुनावताना नमूद केले.
हेही वाचा- शिर्डीसाठी रात्रीही विमानसेवा शक्य, विमानतळावर ‘नाइट लँडिंग’ला परवानगी
पोलिसांच्या आरोपांनुसार, आरोपी बोरोले याने नोव्हेंबर २०१५ ते मार्च २०१६ दरम्यान शाळेच्या आवारात पाचवी व सहावीत शिकत असलेल्या चार पीडित मुलींचा विनयभंग केला होता. बोरोले या विद्यार्थिनींना गणित आणि विज्ञान विषय शिकवत होता. पोलीस आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यात यशस्वी झाल्याचेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे.