केंद्रीय तपास यंत्रणांकडून गैरवापर करत कारवाई केली जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत असतानाच आणखी एका शिवसेना नेत्याची चौकशी सुरु झाली आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नवाब मलिक यांना अटक केली असल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली असतानाच प्राप्तिकर विभागाचे अधिकारी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी पोहोचले आहेत. ANI च्या वृत्तानुसार यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून धाड टाकण्यात आली असून चौकशी सुरु आहे.

“यशवंत जाधवांनी १५ कोटी रुपये UAEला हलवले”; किरीट सोमय्यांचे स्थायी समितीच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप

A case has been registered against Shaina NC for circulating a fake letter on X social media in the name of Muzaffar Hussain
काँग्रेस नेते मुझफ्फऱ हुसेन यांच्या नावाचे बनावट पत्र; शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्यावर गुन्हा दाखल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
Shah Rukh Khan News
शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक; ५० लाखांची मागितली होती खंडणी

प्राप्तिकर विभागाचं पथक मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मुंबईतील घऱी पोहोचलं आहे. माझगावमधील त्यांच्या निवासस्थानी तपास सुरु आहे. दरम्यान तपास सुरु असल्याने इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत.

यशवंत जाधव यांचं माझगावमधील निवासस्थान (Express Photo: Amit Chakravarty)

मिळालेल्या माहितीप्रमाणे, नवाब मलिक यांच्याप्रमाणे पहाटेच प्राप्तिकर विभागाचं पथक यशवंत जाधव यांच्या माझगावमधील निवासस्थानी दाखल झालं. मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने आर्थिक निर्णयांमध्ये यशवंत जाधव यांचा सहभाग असतो. पालिकेच्या कंत्राट आणि अन्य व्यवहारांमध्येही स्थायी समितिची महत्वाची भूमिका असते. याआधी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव शिवसेनेचे महत्वाचे नेते असल्याने या कारवाईमुळे राजकीय वातावरण अजून पेटलं जाण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्यांनी केला होता मनी लॉण्ड्रिंगचा आरोप –

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या महिन्यात यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचे मनी लॉण्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. यशवंत जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे म्हटलं होतं.

“मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी १५ कोटी रुपये रोख स्वरुपात मनी लॉण्ड्रिंग करणाऱ्या उदय शंकर महावारला दिले आहेत. हे पैसे प्रधान डिलर प्रा. लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यात आले. या कंपनीचा एक रुपयांचा शेअर आणखी पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने घेतला. हे सर्व बोगस होते. त्यानंतर हे पंधरा कोटी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे संयुक्त अरब अमिराती येथे हलवले. त्यामुळे १५ कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.