मुंबई: घरफोडी करण्यासाठी घरात घुसलेल्या चोराने दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटे गोवंडी परिसरात घडली. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोवंडी गावात बुधवारी पहाटे २ च्या सुमारास ही घटना घडली. गोवंडी गावात वास्तव्यास असलेल्या ऐश्वर्या पिसे कुटुंबियांसोबत घरात निद्रीस्त होत्या. अचानक त्यांच्या घरात एक चोर शिरला. ही बाब ऐश्वर्या यांच्या लक्षात येताच त्यांनी पतीला उठवले आणि घरात चोर शिरल्याची माहिती दिली. याच वेळी चोराने या पिसे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात पिसे दाम्पत्य गंभीर जखमी झाले.

हेही वाचा… प्लाझालगतचा पदपथ पुन्हा अस्वच्छ; घनकचरा विभागाची भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

ऐश्वर्या यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली आणि आरोपीला पकडले. त्यानंतर त्याला गोवंडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. गोवंडी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून आरोपी अरविंद देशमुखला अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A thief who broke into the house attacked the couple in govandi mumbai print news dvr