मुंबई : हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केल्याच्या रागातून एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयात धमकीचा दूरध्वनी करणाऱ्याविरोधात ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने दूरध्वनी करून ऑस्ट्रेलियात झालेल्या हल्ल्यासारखा प्रकार करण्याची धमकी दिली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. वृत्तवाहिनीच्या कार्यालयातील दूरध्वनी व मोबाइल क्रमांकावर धमकीचा दूरध्वनी करण्यात आला होता.

ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियात ५० लोकांना उडवण्यात आले होते. तशी अवस्था करू, अशा शब्दात आरोपीने धमकावले. यावेळी त्याने दिल्लीतील व्यवस्थापक पदावरील व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक मागितला. त्याला गोळी घालायची आहे, अशीही धमकी दिली. याबाबत सर्व पोलीस यंत्रणांना माहिती देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी मोबाइल क्रमांक धारकाविरोधात धमकाल्यचा गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader