मुंबई : महाराष्ट्र शासनाने अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतीष्ठापना सोहळ्यानिमित्त सोमवार, २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सोमवार, २२ जानेवारी रोजी होणाऱ्या एकूण १४ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. आता या परीक्षा बुधवार, ३१ जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रकही विद्यापीठाने जारी केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सकाळच्या सत्रातील बी.कॉम. सत्र ५ , एम.ए. पब्लिक पॉलिसी सत्र ३, एम.ए. राज्यशास्त्र सत्र १, एम.एस्सी. रिसर्च सत्र १ या चार परीक्षा आहेत. तर दुपारच्या सत्रात बी.एम.एस. – एम.बी.ए. ( ५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र १, तृतीय वर्ष बी.ए. सत्र ५, प्रथम वर्ष एल.एल.बी. – जन. एल.एल.बी. ( ३ वर्षीय अभ्यासक्रम ) सत्र १, प्रथम वर्ष एल.एल.बी. – बीएलएस (५ वर्षीय अभ्यासक्रम) सत्र १, एल.एल.बी. ( ३ वर्षीय अभ्यासक्रम, ७५ : २५) सत्र १, बी.ए. एल.एल.बी. ( ५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम, ७५ : २५) सत्र १, प्रथम वर्ष एल.एल.बी. – जन. एल.एल.बी. (३ वर्षीय अभ्यासक्रम, ६० : ४० ) सत्र १, प्रथम वर्ष एल.एल.बी. – बीएलएस (५ वर्षीय अभ्यासक्रम, ६० : ४०) सत्र १, एम.एस.डब्ल्यू. सत्र ३, एम.एस्सी. रिसर्च सत्र ३ या १० परीक्षा आहेत. सोमवार २२, जानेवारी रोजी होणाऱ्या या सर्व १४ परीक्षा आता सुधारित तारखेनुसार बुधवार, ३१ जानेवारी रोजी होणार आहेत.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Political parties, election campaign. giant hoarding, Mumbai
फलकबाजी… टोलेबाजी; मुंबईत महाकाय फलकांद्वारे राजकीय पक्षांची श्रेयवादासाठी चढाओढ
BCCI conducts 6 hour review meeting with Indian team management
BCCI : टीम इंडियाच्या पराभवावर सहा तास चालली बीसीसीआयची बैठक, रोहित-गंभीरला विचारले ‘हे’ तीन महत्त्वाचे प्रश्न

हेही वाचा >>>सैन्यदलातील नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक; मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई विद्यापीठाची दूर व मुक्त अध्ययन संस्था म्हणजेच ‘आयडॉल’च्या तीन परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘आयडॉल’ची सोमवार, २२ जानेवारी रोजी होणारी प्रथम वर्ष बी.ए. सत्र १ आणि प्रथम वर्ष बी.कॉम. सत्र १ ची परीक्षा मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी होईल. तर एम.एम.एस सत्र २ ची परीक्षा ही गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी घेण्यात येईल, असे ‘आयडॉल’कडून स्पष्ट करण्यात आले.