मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे २४ डब्यांची रेल्वेगाडी तेथून धावू शकणार आहे. आतापर्यंत फलाटाचे ३० टक्के काम झाले असून नोव्हेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर प्रवाशांसाठी अधिक चांगल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनसचा (एलटीटी) विस्तार केला जाणार आहे. परळ टर्मिनस उभे करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच तो मंजुरीसाठी रेल्वे मंडळाकडे सादर केला जाईल.

सीएसएमटी फलाट क्रमांक १० ते १४ च्या विस्ताराला २०१५-१६ साली मंजुरी मिळाली. प्रकल्पाची एकूण किंमत ६२.१२ कोटी रुपये अपेक्षित आहे. सध्या फलाट क्रमांक १०, ११ चा विस्तार झाला असून १२, १३ क्रमांकाच्या फलाटांची दुरुस्ती सुरू आहे. सर्व पायाभूत कामे नोव्हेंबर २०२४ पूर्ण करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेने निश्चित केले आहे. त्यानंतर १० ते १३ या फलाटांवरून २४ डब्यांची रेल्वेगाडी धावण्यास सज्ज होईल. त्यामुळे साधारणपणे ८ रेल्वेगाड्यांच्या डब्यात वाढ होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…

हेही वाचा – विशेष तिकीट तपासणी : विनातिकीट प्रवास करणाऱ्या १,२७३ प्रवाशांकडून चार लाख दंड वसूल

लोकमान्य टिळक टर्मिनसचा विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे. सध्या एलटीटी येथे सात फलाट असून येथून दररोज ५२ रेल्वेगाड्यांची ये-जा होते. तर, दररोज सुमारे ७० हजार प्रवाशांचा प्रवास होतो. चार अतिरिक्त फलाटांचे बांधकाम झाल्यास एलटीटीमध्ये रेल्वेगाड्यांची ये-जा आणि प्रवाशांच्या रहदारीची क्षमता वाढेल.

सीएसएमटीवरील रेल्वेगाड्यांचा भार कमी करण्यासाठी आणि लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी २०१६ साली परळ येथे टर्मिनस बांधण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, अनेक कारणामुळे हे काम रखडलेले आहे. आता पुन्हा नव्याने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे मंडळाकडून परळ टर्मिनस बांधण्याबाबत मंजुरी प्राप्त करणार आहेत.

हेही वाचा – मुंबई – अयोध्या विशेष रेल्वेगाडी

सीएसएमटी येथील फलाट विस्तारीकरणाचे काम नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी नवीन अत्याधुनिक टर्मिनस परळ येथे बांधण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. तसेच, एलटीटी अतिरिक्त फलाट उभे करण्याचे काम सुरू आहे. कल्याण येथील यार्ड री -माॅडेलिंगच्या कामाला गती देण्यात येत आहे. हे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. – राम करण यादव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे