मुंबई : महिलांना स्वावलंबी बनिवणे तसेच स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी अनेक संस्था या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. तथापि करोनाकाळात अनेकांचे घरसंसार उद्ध्वस्त झाल्यानंतर महिला सक्षमीकरणाचा डोळस दृष्टीकोन ठेवून इंडिया स्पॉन्सरशीप कमीटी ‘आयएससी’ या संस्थेचा सक्षम महिला ‘कमाते रहो’ हा उपक्रम अनोखा म्हणावा लागेल. गरीब घरातील कष्टकरी महिलांना अत्याधुनिक पोषाखांपासून पारंपरिक हॅन्डलूमचे उत्तम कपडे शिवण्यास शिकविण्यासून त्याची बाजारात विक्री करून त्यातून मिळणारा नफा या महिलांना देण्याचे आयएससी सक्षम महिला प्रकल्पात केले जाते. विलेपार्ले येथे या महिलांनी बनवलेल्या हॅन्डलूमच्या कपड्यांची तसेच अन्य वस्तूचे एक भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. झुली नाखूदा यांनी १९६७ साली आयएससीची स्थापना केली ती प्रामुख्याने तळागाळातील गरजू मुलांना मदत करून त्यांना बालहक्क प्राप्त करून देणे. सुरुवातीला संस्थेमध्ये १२ होती पुढे १९७६ पर्यंत लोणावळ्याच्या आंतर भारती बालग्राममध्ये १०० मुलांसाठी बाल संगोपन संस्था तसेच अंतर भारती बालग्राम शाळेच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचे काम सुरु झाले. त्यानंतर संस्थेने पुण्यातील यरवडा परिसरात वंचित मुले तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐशीच्या दशकात काम सुरु केले. सुरुवातीच्या काळात म्हणजे ऐशीच्या दशकात यरवडा परिसरातील गरजू महिलांना लोणची-पापड आदी खाद्यपदर्थ बनविण्यापासून ते शिवणकामादीचे प्रशिक्षण देऊन त्यांनी बनविलेल्या उत्पादनांची विक्री करण्यास संस्थेच्या माध्यमातून मदत करण्यात येत होती. करोनाने परिस्थितच बदलून गेली. या तळागाळातील वर्गाचा रोजगार बुडाला. त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी नव्याने व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाल्याचे आयएससीच्या पुण्यातील सक्षम प्रकल्पाच्या कार्यकारी संचालिका मेधा वाटवे-ओक यांनी सांगितले. आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्याच्यादृष्टीने नव्याने आखणी केली. यासाठी पुणे परिसरातील पाच वस्त्यांमधून सर्वेक्षण करण्यात आले. अनेक महिलांशी बोलून त्यांच्या क्षमतेचाही आढावा घेण्यात आला. आमच्या या उपक्रमासाठी एचडीएफसी सिक्युरिटीजने महिला सक्षमीकरण उपक्रमाला निधी उपलब्ध करून दिला. महिलांना फोटोग्राफी, ब्युटी ॲण्ड वेलनेस, पेंटिंग, कृत्रिम ज्वेलरी बनवणे तसेच संगणक प्रशिक्षणापासून ते वाहान चालविण्यापर्यंत विविध उपक्रम राबवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत केली. त्याचप्रमाणे उषा शिलाईबरोबर सहकार्यातून या महिलांना दर्जेदार हॅन्डलूमचे विविध कपडे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आजच्या तरुणाईची तसेच महिलांची गरज लक्षात घेऊन वेगवेगळे आकर्षक कपडे या महिला बनवत आहेत. या महिलांना यासाठी लागणारी शिलाई मशिन तसेच कच्चामाल देण्यापासून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी ‘सक्षम’कडून घेण्यात येते. गेल्या चार वर्षात आम्ही पुणे व लोणावळा येथे या महिलांनी बनवलेल्या कपडे, बॅग्ज तसेच अन्य वस्तूंच्या विक्रीसाठी संस्थेने केंद्र सुरु केले आहे तसेच पुण्यासह अनेक ठिकाणी प्रदर्शन भरविण्यात येतात. वर्षाकाठी साधारणपणे पंधरा ते वीस प्रदर्शनांच्या माध्यामातून या महिलांनी बनविलेल्या वस्तु व कपड्यांची विक्री केली जाते असे मेधा ओक यांनी सांगितले. या सक्षम उपक्रमात डॉ शुभांगी भोर, डॉ संदेश कदम, क्रांती साळवी, ज्योती धीवर, संतोष चव्हाण तसेच अध्यक्ष शैलेश डालमिया आदींचा मोलाचा वाटा असल्याचे मेधा यांनी सांगितले.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
‘महिला आणि हवामान बदलावरील जनतेच्या मागण्यांची सनद’; राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आवाहन | Charter of People Demands on Women and Climate Change Appeal to political parties and candidates Mumbai
‘महिला आणि हवामान बदलावरील जनतेच्या मागण्यांची सनद’; राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आवाहन

हेही वाचा – मुंबई : मध्य वैतरणा आणि मोडक सागर धरणांदरम्यान बंधारा बांधणार, धरणातील विसर्गातून वाया जाणारे पाणी वाचवणार

हेही वाचा – मुंबई : पाच वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा

करोनानंतर सुमारे ४५० महिलांना आम्ही तयार कपडे बनविण्याच्या कामात प्रशिक्षित केले असून ५० महिला -मुली या आमच्या केंद्रात येऊन कपडे बनविण्याचे काम करतात. या विक्रीमधून मिळणाऱ्या पैशातून आमची संस्था एक रुपयाही नफा कमवत नाही. केवळ कच्चामाल व प्रदर्शनादीसाठी येणारा खर्च वगळता उर्वरित नफा या महिलांमध्ये वाटला जातो. साधारणपणे चारपाच हजारापासून ते दहापंधरा हजारापर्यंत स्वत:च्या घरीच वस्तू बनवून आज या महिला कमावतात असेही मेधा ओक यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर विलेपार्ले येथील दशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, हनुमान रोड येथे येत्या ५ व ६ ऑक्टोबररोजी आयएससी सक्षम हॅन्डीक्राफ्ट प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्वत:च्या पायावर उभे राहू पाहाणाऱ्या या महिलांच्या या ‘कमाते रहो’ उपक्रम नक्कीच पाहाण्यासारखा असेल.