मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांवर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही कामे ठरलेल्या मुदतीत पूर्ण होत आहेत की नाहीत, तसेच कामांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात येणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई सुंदर आणि अधिक आकर्षक बनविण्यासाठी महानगरपालिकेने ‘मुंबई सुशोभिकरण प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पातील विविध कामे तत्काळ सुरू व्हावी आणि एकूण निश्चित कामांपैकी किमान ५० टक्के कामे डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत, तर उर्वरित कामे मार्च २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प निविदा प्रक्रियेच्या स्तरावरच रखडला होता. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकल्पातील ५०० कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कामांचा आढावा घेण्यासाठी व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी दक्षता समिती नेमण्यात येणार आहे. तसे आदेश इकबाल सिंह चहल यांनी नुकतेच दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा