मुंबई : दहिसर येथील हरेम टेक्स्टाईलसमोर टोल नाक्याजवळ मंगळवारी सकाळी ३०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. यामुळे टोलनाका परिसरात पाणी साचले असून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीतर्फे देखभालीचे काम सुरू असताना ही घटना घडली. मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदत क्रमांकावरून घटनेची माहिती मिळताच जलअभियंता विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुपारी ४ वाजेपर्यंत जलवाहिनीचे दुरुस्तीकाम पूर्ण होईल, असे महनगरपलिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
First published on: 05-12-2023 at 15:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A water pipe burst in dahisar wasting thousands of liters of water mumbai print news ssb