मुंबई : अंधेरी पश्चिम येथील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाच्या शेजारील भूखंड मिळूनही प्रत्यक्ष ताब्यासाठी एका ८५ वर्षे वयाच्या डॉक्टरने २५ वर्षे दिलेल्या लढ्याला यश आले आहे. परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारल्या जाणाऱ्या कर्करोग व बहुद्देशीय रुग्णालयाचा पायाभरणी समारंभ अलीकडे झाला. या रुग्णालयाचे व्यवस्थापन टाटा ट्रस्टच्या आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या कार्किनोज हेल्थकेअरमार्फत सांभाळले जाणार आहे.

अंधेरी पश्चिम चार बंगला येथील रुग्णालयासाठी राखीव असलेला सुमारे १२ हजार चौरस मीटर इतका भूखंड मिळावा, यासाठी शांताबाई केरकर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व बालरोगतज्ज्ञ डॉ. बळवंत केरकर यांनी १९७९ मध्ये अर्ज केला. मात्र हा भूखंड उद्योग विभागातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतींसाठी राखीव असल्याचे सांगण्यात आले. १९९१ मध्ये या भूखंडावर रुग्णालय व प्रसुतिगृहाचे आरक्षण ठेवण्यात आले. त्यामुळे ट्रस्टने १९९२ मध्ये पुन्हा अर्ज केला. त्या अर्जाचा विचार झाला नाही. मात्र शिवसेना-भाजप युती शासनाने विख्यात हृदय शल्यविशारद नीतू मांडके यांच्या ट्रस्टला एक रुपया प्रति चौरसमीटर या दराने हा भूखंड ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने दिला. त्यामुळे ट्रस्टने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने या वितरणाला स्थगिती दिली. थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मांडके यांची शिफारस केल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ट्रस्टची समजूत काढून शेजारील ३७०० चौरस मीटर भूखंड देण्याची तयारी दाखविली. ६ जुलै १९९८ रोजी शांताबाई केरकर ट्रस्टला भूखंड वितरणाचे इरादा पत्र देण्यात आले. मात्र आवश्यक ती कागदपत्रे सादर करूनही २००४ मध्ये वितरण रद्द करण्यात आले. त्यामुळे ट्रस्टने पुन्हा न्यायालयात धाव घेतली. पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. परंतु त्यात काहीही झाले नाही.

Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Marathi Actress Shivani Sonar Share Special Post For mother on 50th birthday
“अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, होणारा नवरा अंबर गणपुळे कमेंट करत म्हणाला…

हेही वाचा – वांद्रे-कुर्ला संकुलात पॉड टॅक्सी आगार उभारणार

ट्रस्टने पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावले आणि न्या. श्रीमती आर. पी. सोंदूरबलडोटा यांनी १ एप्रिल २०१३ रोजी ट्रस्टच्या बाजूने निकाल देत प्रकल्प अहवाल नव्याने सादर करण्याचे आदेश दिले. मात्र या आदेशाला शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. ती लढाईही डॉ. केरकर जिंकले. अखेर २५ वर्षांनंतर डॉ. केरकर यांनी शांताबाई केरकर मेमोरिअल रुग्णालय आणि सरस्वती देवी कॅन्सर रिचर्स सेंटर या बहुद्देशीय रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

हेही वाचा – रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर नियुक्तीची पत्रे, मध्य रेल्वेतील धक्कादायक प्रकार

टाटा कर्करोग रुग्णालयातील डॉक्टर्स या रुग्णालयाशी संलग्न असणार आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरातील कर्करोगग्रस्तांना फायदा होईलच. परंतु परवडणाऱ्या दरात अन्य वैद्यकीय सेवा देणारे हे सुसज्ज रुग्णालय असेल, असा विश्वास डॉ. केरकर यांनी व्यक्त केला आहे.