मुंबईः वडाळा पूर्व येथील मुंबई पोर्ट ट्रस्टजवळ (एमबीपीटी) महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेच्या डोक्यात प्रहार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर एमबीपीटी परिसरात मृतदेह आणून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमबीपीटी प्रवेशद्वार क्रमांक ४ व ५ च्या दरम्यान जळालेल्या गोणीत गुरुवारी या महिलेचा मृतदेह सापडला. याबाबतची माहिती मिळताच वडाळा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पण ती ३५ ते ४० वयोगटातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महिलेच्या डोक्याला गंभीर जखमा आहेत. याशिवाय हाताचे दोन्ही कोपर व पायाचे गुडघे तुटलेले आहेत. याशिवाय शरीर पूर्ण जळाल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – भाजपबरोबर सरकार हाच शिवसेना सोडल्याचा पुरावा; अध्यक्षांपुढील सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तिवाद

हेही वाचा – कुणबी प्रमाणपत्र समितीला २४ डिसेंबपर्यंत मुदतवाढ; कागदपत्रे लवकर मिळण्यासाठी तेलंगण सरकारला पत्र

गोणीत भरून मृतदेह घटनास्थळी आणून तो जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेचा मृतदेह परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आला असून तेथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पोलिसांना महिलेच्या हातात अंगठी व कानात कर्णफुले सापडली आहेत. त्याद्वारे तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने संशयीत आरोपीची माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. वडाळा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman deadbody was found near mumbai port trust in wadala east mumbai print news ssb