लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईः ऑनलाइन पद्धतीने ‘घरातून कार्यालयीन काम’ करण्याची सुविधा असलेल्या कंपनीतील नोकरीच्या शोधात असलेल्या घाटकोपर येथील एका ३२ वर्षीय महिलेची चार लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. गरोदर असल्यामुळे सदर महिला ‘घरातून कार्यालयीन काम’ करता येईल अशा नोकरीच्या शोधात होती. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी तपास सुरू केला असून सायबर भामट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तक्रारदार महिला पूर्वी ई-कॉमर्स संकेतस्थळावर काम करीत होती. गरोदर राहिल्यामुळे तिने नोकरी सोडली. तिने नोकरीसाठी एका संकेतस्थळावर आपली माहिती उपलब्ध केली होती. त्यानंतर तिला एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर एक संदेश आला. तिने टेलिग्राम मेसेंजरवर एखादे काम पूर्ण केल्यास तिला १५० रुपये मिळतील, असे या संदेशात नमुद करण्यात आले होते.

हेही वाचा… VIDEO: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, जाणून घ्या कुठे-कुठे धावणार

हे काम योग्य वाटल्यामुळे ती टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी झाली. दिलेले काम पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला तिला कमिशन मिळाले. नंतर तिने आणखी कार्ये पूर्ण केली, कार्यांचा भाग म्हणून ऑनलाइन उत्पादने खरेदी केली आणि तिच्या व्हर्च्युअल वॉलेटमध्ये पैसे जमा केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. सायबर भामट्यांवर विश्वास ठेऊन त्यांनी सांगितलेल्या सूचनांचे तिने पालन केले आणि विविध वस्तू खरेदी केल्या. काही उत्पादने खरेदी करण्यासाठी तिला यूपीआय आयडीद्वारे खात्यात पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले.

हेही वाचा… राज्याचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात; बलशाली महाराष्ट्रासाठी सर्वानी एकत्र येऊ या – राज्यपाल बैस यांचे आवाहन

तक्रारीनुसार, महिलेने एकूण चार लाख ८२ हजार रुपये खर्च केले आणि तिला कंपनीतर्फे पैसे मिळण्याची ती वाट पाहत होती. खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे तिने याबाबत चौकशी केली असता एकूण सात लाख ९२ हजार रुपये कमिशन मिळवण्यासाठी आणखी दोन लाख रुपये जमा करण्याची सूचना तिला करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिने पंतनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

हेहा वाचा… जिल्हाधिकारी कार्यालयात रोज लोकदरबार ; मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

पंतनगर पोलिसांनी अलीकडेच माहिती तंत्रज्ञानाचा कलम ४१९ (व्यक्तीद्वारे फसवणूक), ४२० (फसवणूक) आणि तसेच माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६ (क) (ओळख चोरी) आणि ६६ (ड) (संगणक उपकरणाचा वापर करून फसवणूक) अंतर्गत दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्ह्यात वापरलेले मोबाइल क्रमांक, बँक खाती, यूपीआय आयडी आणि ई-वॉलेटचा तपशील मिळविण्यासाठी पोलिसांनी संबंधित कंपन्यांना पत्र पाठवले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman from ghatkopar mumbai who was looking for a job in a company with work from home facility was defrauded mumbai print news dvr
Show comments