मुंबई : मध्य रेल्वेवरील विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकीट तपासनीस धरपकड करीत आहेत. विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात महिला तिकीट तपासनीस आघाडीवर आहेत. मध्य रेल्वेच्या तेजस्विनी विशेष पथकाच्या मुख्य तिकीट परीक्षक सुधा द्विवेदी यांनी एकाच दिवसात १०३ विनातिकीट प्रवाशांची धरपकड करून दंड वसूल केला.

मध्य रेल्वेवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या गर्दीत अनेक जण विनातिकीट प्रवास करतात. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमधील लोकल, मेल-एक्स्प्रेस, फलाटावर तिकीट तपासनीसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे अलिकडेच विविध स्थानकांवर ‘नव दुर्गा’ पथकामार्फत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. तिकीट तपासणी मोहिमेला बळकटी देणे, सणासुदीच्या काळात योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याबाबत जनजागृती करणे हा मुंबई विभागाच्या सर्व महिला विशेष तिकीट तपासनीसांच्या तेजस्विनी पथकाने राबविलेल्या या उपक्रमामागील उद्देश होता. यावेळी तेजस्विनी विशेष पथकाने अनियमित किंवा विनातिकीट प्रवासाची ३१८ प्रकरणे नोंदवली. या मोहिमेत एकूण ९६ हजार २४० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर, तेजस्विनी विशेष पथकातील कर्मचाऱ्याने सरासरी ३५ विनातिकीट प्रकरणे हाताळून प्रति कर्मचारी १० हजार ६९३ रुपये दंड वसूल केला. तर, मुख्य तिकीट परीक्षक सुधा द्विवेदी यांनी एका दिवसात १०३ विनातिकीट प्रवाशांना पकडून विशेष कामगिरी केली.

Air India buys 85 Airbus
तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या हवेतच दोन तास घिरट्या; १४० प्रवासी करत होते प्रवास; अखेर झालं सुरक्षित लँडिंग!
Daily Horoscope 25th October in Marathi
Today’s Horoscope, 25 October : पंचांगानुसार आजचा शुभ…
metro ticket booking on WhatsApp
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांचे तिकीट आता व्हॉट्सॲपवरही, महिला प्रवाशांच्या हस्ते पर्यावरणस्नेही व्हॉट्सॲप तिकीट सेवा सुरू
WR collects fine from ticketless travellers
विनातिकीट प्रवाशांकडून ६८ कोटी रुपये दंड वसूल
6556 special trains on the occasion of Diwali Chhath Puja Mumbai news
दिवाळी, छठ पूजेनिमित्त ६,५५६ विशेष रेल्वेगाड्या
अखेर मुंबईकरांना घडणार भुयारी मेट्रोचा प्रवास… कशी आहे आरे – बीकेसी मेट्रो मार्गिका?
Konkan Railway, Konkani passengers, Konkan,
कोकणी प्रवासी कायम दुर्लक्षित
Shivneri Sunadri News
Shivneri : विमानातील हवाई सुंदरी प्रमाणे आता शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’, भरत गोगावलेंची घोषणा

हेही वाचा – लोकसेवा आयोगाने सात सहाय्यक आयुक्तांची शिफारस यादी केली जाहीर, अवमान याचिका दाखल केल्यानंतर आयोगाची सावध भूमिका

महिला तिकीट तपासनीसांनी १ ते २० ऑक्टोबर या कालावधीत एकूण ११ हजार ९७१ विनातिकीट प्रवाशांना पकडून ३३ लाख ९८ हजार ७३२ रुपये दंड वसूल केला.

हेही वाचा – ‘कोल्ड प्ले’, ‘दिलजीत कॉन्सर्ट’ तिकीट काळाबाजार प्रकरण : ‘ईडी’चे देशभरात १३ ठिकाणी छापे

वातानुकूलित लोकलमधील एक हजार ८६० प्रवाशांकडून ६ लाख ४८ हजार ५७० रुपये दंड वसूल, प्रथम श्रेणीतील चार हजार ६२२ प्रवाशांकडून १४ लाख ३८ हजार ५५० रुपये दंड वसूल, द्वितीय श्रेणीतील चार हजार ६६४ प्रवाशांकडून १२ लाख १५ हजार ८८२ रुपये दंड वसूल, आरक्षित न केलेले सामान प्रकरणी ८२५ प्रवाशांकडून ९५ हजार ७३० रुपये दंड वसूल.